®अधिवेशन वृतसेवा, खर तर आपण पाहतो, बर्याच ठिकाणी पोळी किंवा इतर काही खाद्य पदार्थ, जसे की, भजे, पोळी, वडापाव, चिवडा, काही वेळेस फळे, यांसारख्या बर्याच गोष्टी या न्यूजपेपर मध्ये गुंडाळून देण्याच्या किंवा खाण्याच्या सवयी या लागलेल्या असतात. जर फळे किंवा इतर कोरडे पदार्थ न्यूज पेपर मध्ये दिले तर ठीक आहे, परंतु जर ओले किंवा तळलेले खाद्य पदार्थ, गरम पोळ्या किंवा इतर गरम वस्तु जर आपण त्या न्यूजपेपरवर टाकल्या तर त्या न्यूज पेपर वर असलेली छपाई ची शाई ही खाद्यपदार्थात उतरण्याची शक्यता असते, त्यामुळे हे शाई जर आपल्या पोटात गेली तर, त्याचे विपरीत परिणाम सहन करावी लागतील, त्यामुळे नक्कीच न्यूजपेपर मध्ये आपण अनेक खाद्यपदार्थ गुंडाळून ठेवतो किंवा खातो, ते शरीरास अपायकारक आहेत. न्यूज पेपर वर वापरली जाणारी छपाई प्रिंट पोटात गेल्यास, त्यामुळे उलट्या होऊ शकतात, जास्त प्रमाणात आपल्या पोटात ही शाई गेल्यास कर्करोग देखील होऊ शकतो. ही प्रिंटिंग इंक आरोग्यास अपायकारकच आहे. तरी देखील बर्याच गृहीणींना सवय असते की, पोळी भाकरी बनवली की, ती लगेच गरम असतानाच न्यूजपेपर गुंडाळून ठेवतात, परंतु ते आरोग्यास अत्यंत अपायकरक आहे. आपल्या आरोग्यास अपायकारक अश्या कोणत्याही गोष्टी करणे टाळावे, त्यामुळे आपले आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल. अन्नपदार्थांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी १९५४ पासून अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा २०११ पर्यंत लागू होता. दि. ५ ऑगस्ट २०११ पासून अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याची जागा अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ या नवीन कायद्याने घेतली आहे. यामध्ये संपूर्ण देशभरात अन्नपदार्थांवरील नियंत्रणात सुसूत्रता आणली गेली आहे. आरोग्यास हानिकारक नसलेल्या भेसळीबाबत व कायद्यातील इतर किरकोळ अटींचे उल्लंघन करणार्या अन्न व्यावसायिकांना न्यायनिर्णय प्रक्रिया अवलंब करून फक्त दंड भरून सोडण्याची तरतूद या नवीन कायद्यात आहे. महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त हे न्यायनिर्णय अधिकारी म्हणून काम पाहतात. न्यायनिर्णय अधिकार्यांना रु. १० लाखांपर्यंत दंड करण्याचे अधिकार आहेत. ★★★★★