वाहन चोरीची ऑनलाइन तक्रार कशी करावी ?

®अधिवेशन वृतसेवा कल्याण, दि. 25 : वाहन म्हणजे एक असे साधन जे मानवी अथवा वस्तूंच्या वाहतुकीसाठी उपयोगी असते. आपला दैनंदिन त्रास कमी करण्यासाठी आपण वाहनाचा वापर करत असतो. आपण नवीन वाहन किंमत अदा करून विकत घेतो. परंतु तेच वाहन काही कारणामुळे चोरीला गेले तर आपल्याला खूप मनस्ताप होतो. परंतु आता चिंता करण्याची गरज नाही. आजच्या धावत्या युगात आपले वाहन जर चोरीला गेले तर ते शोधणे अतिशय सोपे झाले आहे. आणि सरकार ही आपल्याला या बाबत मदत करत असते.आपले वाहन जर चोरीला गेले तर आपण सर्वात आधी पोलिसांकडे धाव घेतो आणि आपली तक्रार नोंदवतो. परंतु ही नोंद होण्यासाठी खूप उशीर होतो. याच कारणास्तव चोरी झालेल्या वाहांनाची नोंद तातडीने व्हावी म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी ‘वाहनचोरी तक्रार’ नावाचे एक नवीन पोर्टल सुरू केले आहे.या पोर्टलच्या साहाय्याने आपल्याला आता वाहनचोरीची तक्रार एका मिनटात करता येणे शक्य झाले आहे. या वाहन चोरीच्या ऑनलाईन तक्रारीमुळे वाहननोंदणी संबंधित गुन्हे थेट दाखल होत आहेत.
यात, महत्वाचे म्हणजे मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे आपल्या वाहन चोरीची तक्रार दाखल करताना चालढकल होत नाही.वाहनचोरीच्या वाढत्या घटनांमुळे अनेकदा वाहन चोरीचे गुन्हे उशिराने दाखल होत होते. संबंधीत वाहन मालकास पोलिस स्टेशनला चक्करा माराव्या लागत होत्या.अशातच आपल्या चोरी गेलेल्या वाहनाचा वापर करून त्या वाहनाच्या साहाय्याने काही गंभीर गुन्हे झाले तर त्याचा मनस्ताप वाहन मालकाला होत होता. याच पार्श्वभूमीवर सर्व गोष्टींचा विचार करून महराष्ट्र राज्य पोलिसांनी राज्य पातळीवर एक ‘वाहनचोरी तक्रार’ नावाचे पोर्टल सुरू केले आहे.आता आपल्या मोबाईल मध्ये असलेल्या इंटरनेटच्या वापराने आपण घरबसल्या वाहन चोरी झाल्याची तक्रार नोंदवू शकतो. तसेच तक्रार नोंदवल्यानंतर आपल्या वाहन तपासाबाबतची माहितीही आपल्याला समजणार आहे.

● सर्व प्रथम महाराष्ट्र राज्य पोलिसांनी सुरू केलेल्या वाहनचोरी तक्रार या अधिकृत संकेस्थळावर भेट द्या. किंवा ११२ डायल करा.
https://dial112.mahapolice.gov.in/CitizenPortal-Maharashtra/mr/stolen-vehicle
● आपण जर नवीन युजर असाल तर सर्व प्रथम पोर्टलवर जावून नोंदणी करून घ्या.
● नोंदणी करण्यासाठी स्वतःचे नाव, स्वतःचा मोबाईल क्रमांक, ई-मेल आय डी, आधार कार्ड नंबर, ई. आवश्यक माहिती भरा.
● आपला युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून घ्या. त्यानंतर तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर वर एक OTP प्राप्त होईल.
● सदर OTP भरा, आणि लॉगिन व्हा. लॉगिन झाल्यानंतर आपल्या हरवलेल्या वाहनाची तक्रार करा.
● तक्रार नोंदविताना वाहन प्रकार, वाहन नोंदणी क्रमांक, वाहन कंपनी, इंजिन नंबर, चेईसीज नंबर, वाहन मालकाचे नाव, वाहन हरवले किंवा चोरीचे ठिकाण, वाहन चोरी गेल्याची तारीख, जिल्हा, ई. आवश्यक माहिती भरा.
● सर्व माहीत योग्य आणि अचूक भरली आहे याची खात्री करा. आणि आपली तक्रार नोंदवा.
तसेच, आपले वाहन चोरीला गेल्याची तक्रार आपण खालील संकेत्थळावर देखील करू शकतो. आपल्या मोबाईल वर 112 हा नंबर डायल करा आणि तक्रार नोंदवा. तक्रार नोंदवण्यापूर्वी वाहांची सर्व माहिती जवळ ठेवा जसे की वाहनाचे मॉडेल, रंग, वर्ष, परवाना नंबर प्लेट, ई.

वाहन ओढून नेले असेल तर काय करावे ?
आपल्याला जर खात्री असेल की वाहतुक विभागाने आपले वाहन ओढुन नेले आहे, तर जवळील वाहतुक विभागाशी संपर्क साधा.

चोरी गेलेले वाहन परत मिळाले तर काय करावे ?
● सर्वप्रथम आपल्याला परत मिळालेल्या वाहनाची काळजी पूर्वक तपासणी करा.
● तपासणी करणे गरजेचे आहे कारण चोरीला गेलेले वाहन इतर गुन्ह्यामध्ये वापल्याचा पुरावा असू शकतो.
● आपल्या वाहनाचे आतील भाग काळजीपूर्वक तपासून पहा.
● वाहनांमध्ये कोणतीही अवैध गोष्ट आढळल्यास त्वरित 112 ला सूचित करा.
लक्षात असू द्या, वाहनचोरी तक्रार या पोर्टलचा वापर राज्य स्तरावर जरी होत असेल तरी, आपण भरलेल्या माहितीनुसार संबंधित पोलिस स्टेशनला ती तक्रार जमा केली जाते. केलेल्या तक्रारीवर वरिष्ठ पोलिस अधिकारी लक्ष ठेऊन असतात. आणि त्या मार्गाने त्या तकरीवर कार्यवाही सुरू केली जाते. परंतु, सदर तक्रार खोटी किंवा चुकीच्या अनुषंगाने असेल तर सदर व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही केली जाते.

Scroll to Top