®अधिवेशन वृतसेवा, कल्याण : कल्याण अत्याचार प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजप आमदार चित्रा वाघ यांनी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याला भेट दिली. चित्रा वाघ यांनी पोलिसांकडून कल्याण अत्याचार प्रकरणाची माहिती घेतली. आरोपीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना चित्रा वाघ यांनी पोलिसांना दिल्या. तसेच परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे भेट देऊन या प्रकरणाचा तपास जलद गतीने होण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे आणि अन्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ★★★★★