®अधिवेशन वृतसेवा, दिलीप शिंदे, सोयगाव दि. ३१ : डिसेंबर महिना आता संपत आला असून, नववर्षात सुट्यांची काय मेजवानी असेल, याकडे नोकरदार वर्गाचे लक्ष लागले आहे. कर्मचारी नवीन वर्षाची दिनदर्शिका येताच, त्यामध्ये नवीन वर्षातील सुट्यांचा शोध घेतात. नववर्षात सरकारी नोकरदारांना २५ प्रासंगिकसह सुट्यांचे शतक उपभोगण्यास मिळणार आहे. मात्र, काही सुट्या शनिवारी, रविवारी आल्याने त्या बुडणार आहेत. नववर्षात सुट्यांमध्ये बदल झाला असून, केवळ पाच सुट्या एकत्रित आल्या आहेत. सहा ते सात वेळेस अशी आहे. सुट्यांची पर्वणी; प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी, महाशिवरात्री २६ फेब्रुवारी, होळी १४ मार्च, गुढीपाडवा ३० मार्च, रमजान ईद ३१ मार्च, रामनवमी ६ एप्रिल, श्री महावीर जयंती १० एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल, गुड फ्रायडे १८ एप्रिल, महाराष्ट्र दिन १ मे, बुद्ध पौर्णिमा १२ मे, बकरी ईद ७ जून, मोहरम ६ जुलै, स्वातंत्र्य दिन व पतीती १५ ऑगस्ट, श्रीगणेश चतुर्थी २७ ऑगस्ट, इद-ए-मिलाद ५ सप्टेंबर, महात्मा गांधी जयंती व दसरा २ ऑक्टोबर, लक्ष्मीपूजन २१ ऑक्टोबर, बलिप्रतिपदा २२ ऑक्टोबर, भाऊबीज २३ ऑक्टोबर, गुरुनानक जयंती ५ नोव्हेंबर, ख्रिसमस २५ डिसेंबर, अशा २५ सार्वजनिक सुट्या शासनाने जाहीर केल्या आहेत.लगतच्या सुट्यांची पर्वणी एन्जॉय करावयास मिळणार आहे. नव्या वर्षात सार्वजनिक व रविवारच्या मिळून एकूण ७४ सुट्या आहेत. दुसरा व चौथा शनिवार मिळून या सुट्या १०० वर जाणार आहेत. नवीन वर्षात २५ गॅझेटेड सुट्या असतील. स्थानिक पातळीवर घेण्यात येणाऱ्या सुट्या वेगळ्या राहतील, त्यांचा उल्लेख शासकीय यादीत नाही. शासकीय सुट्याप्रमाणे शनिवार व रविवारच्या सुट्या हव्याहव्याशा असतात. मात्र, २५ पैकी पाच सुट्या शनिवार व रविवारला येत असल्याने नोकरदारांचा काहीसा हिरमोड होणार आहे. महात्मा गांधी जयंती व दसरा २ ऑक्टोबरला येत असल्याने ही एक सुटी बुडेल. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी, गुढीपाडवा ३० मार्च, रामनवमी ६ एप्रिल, बकरी ईद ७ जून, मोहरम ६ जुलै हे सण शनिवारी असून, कर्मचाऱ्यांच्या सुट्या बुडाल्या आहेत. मात्र, २० व इतर तीन सुट्या त्यांच्या पदरात पडतील.