लूटमार करणार असल्याची माहिती दिल्याने दैनिक वृत्तपत्राच्या संपादकावर खूनी हल्ला, आरोपी ताब्यात

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर :  उल्हासनगर कॅम्प 3 मधील हिंदमाता या दैनिक वृत्तपत्राच्या संपादक पंजू बजाज यांनी लूटमार’ व ‘दरोडेखोरी’ (रॉबरी अँड डकॉइटी) करणार असल्याची फिर्याद उल्हासनगर पोलिसांना दिली होती त्या घटनेचा राग मनात धरून आरोपी मुख्य सुत्रधार प्रेम उर्फ गोटा याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने  काल (दि.26) रात्री संपादक पंजू बजाज यांच्या उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाणे च्या हद्दीत त्याच्या वृत्तपत्र कार्यालयाजवळ येऊन पिस्टल सारख्या वस्तूचा धाक दाखवत डोक्यावर चॉपर सारख्या धारधार वस्तूने आणि स्टील रॉड ने हाता पायावर जबर मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संबधित मध्यवर्ती पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांना विचारले असता. त्यांनी सांगितले. की मुख्य आरोपी सुत्रधार प्रेम उर्फ गोटा सह एकूण 4 आरोपी असून याचा पुढील तपास घेऊन आम्ही त्यांना लवकरच ताब्यात घेऊ. असे संगितले. ★★★★★

Scroll to Top