पोलीस दलात आड नावाने नाही तर प्रथम नावानेच मारली जाणार हाक..!

®अधिवेशन वृतसेवा, बीड : गेल्या अनेक महिन्यांपासून बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक परिस्थिती मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यात दोन घटकांतील तणाव ही समोर येत आहेत. सामाजिक घटकांबरोबरच पोलिस दलातील सलोखा कायम ठेवण्यासाठी आणि मतभेद व मनभेद टाळण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी पुढाकार घेतला आहे. पोलिस दलात यापुढे एकमेकांना हाक देताना आडनाव नाहीतर नावाने हाक दिली जाईल. कर्तव्यावर असताना रील्स काढण्यावर ही पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी निर्बंध घातले.
अनेकदा आड नावाच्या उच्चारावरून जातीचा संबोध होतो. ते टाळण्यासाठी नावानेच हाक देण्याच्या सूचना श्री. नवनीत कॉवत यांनी केल्या. नावाने हाक दिल्याने आपुलकी व जवळीक वाटते, असे ही त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी या पुढे सगळ्या प्रकारची जबाबदारी ठाणेदारांचीच असेल. ठाण्यातील कोणावर ही लाचलुचपतची कारवाई झाली तर त्यालाही ठाणे अंमलदारास जबाबदार धरण्यात येईल.
रील्सचे फॅड ही सर्वत्र वाढले आहे. पोलिस खात्यात सुद्धा कर्मचाऱ्यांपासून अधिकारी ही रील्स काढण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशांना ही नवनीत कॉवत यांनी तंबी दिली आहे. कर्मचाऱ्यांनी ऑन ड्युटी रील्स काढली तर त्याच्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. ★★★★★

Scroll to Top