उल्हासनगर मध्ये डास नियंत्रणाची गरज

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : शहरात डासांचा उच्छाद वाढला असून डास निर्मूलनासाठी कोठेही धूर फवारणी वा तत्सम खबरदारीचे उपाय होताना दिसत नाही. दुसरीकडे, कोणत्याही प्रतिबंधक उपायांचा परिणाम डासांवर होत नसल्याचे दिसत आहे. डासांमुळे विविध प्रकारच्या तापाचा प्रसार होतांना दिसत असतो. त्यामुळे डासप्रतिबंधक साधनांचा लोकांच्या खिशावर भार पडतो आहे. बाजारात सध्या एक कॉईल पाच, तर रीफिल किमान 50 रुपयांना मिळते. एका अर्थाने, प्रत्येक कुटुंबावर महिन्याला दीडशे ते दोनशे रुपयांचा भार पडतो आहे.
उष्ण हवामान आणि शहरात जागो जागी साचलेले पाणी यामुळेही डासांचे प्रमाण वाढत आहे. डासाच्या चाव्याने रोगाची बाधा होऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्‍यांची संख्या ही वाढत आहे.

याची आहे गरज
> सांडपाणी निचर्‍याची उत्तम सुविधा केल्यास मोकळ्या नाल्यांत डासांची उत्पत्ती होणार नाही.
> मोकळे भूखंड बंद पडके शौचालये विकसित केल्यास स्वच्छता राहील.
> सर्व वसाहतींमध्ये आठवड्यातून दोन दिवस फॉगिंग आवश्यक.
> नदी किंवा इतर पाण्याचा स्रोत स्वच्छ करून तेथे ब्लिचिंग पावडरची फवारणी.

१ . नाले सफाई – शहरातील प्रमुख तसेच उपनाले स्वच्छ करून त्यामधील गाळ, प्लास्टिक आणि अन्य अडथळे काढने जेणेकरून पाण्याचा प्रवाह सुरळीत राहील आणि डास तसेच दुर्गंधीमुळे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव रोखला जाईल.
२ .औषध फवारणी – डेंग्यू, मलेरिया आणि अन्य कीटकजन्य आजार रोखण्यासाठी महापालिकेद्वारे डास प्रतिबंधक आणि जंतूनाशक औषधांची नियमित फवारणी वारवार होणे आवश्यक सार्वजनिक शौचालये,  नाले,  बाजारपेठा आणि वस्ती भागांमध्ये औषध फवारणी बाबत नागरिकाकडून Feedback घेणे.
३ . रस्ते व परिसर स्वच्छता – शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्ते झाडून रस्त्यांवर धूळ कमी करण्यासाठी पाण्याचा फवारा मारल्याची खात्री करावी. याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या कचराकुंड्या वेळेवर रिकाम्या करून त्याठिकाणी निर्जंतुकीकरण प्रक्रिया करावी.
४ . शहरातील सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांची नियमित स्वच्छता व देखभाल सुनिश्चित करण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवली जावी नागरिकांना स्वच्छ आणि सुलभ शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही शौचालये वेळोवेळी स्वच्छ करून निर्जंतुकीकरण केले जावे. ★★★★★

Scroll to Top