लॉज मालकांची व्यवसाय विषयी ओरड…

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर परिमंडळ 4 च्या हद्दीत अनेक लॉजिग अँड बोर्डिंग आहेत. जी आपली सेवा प्रामाणिक पणे देत असतात. मग ते विविध ऑनलाइन कंपन्या सोबत ही काम करतांना दिसतात जसे की Oyo किंवा ईतर असे अनेक कंपन्या आहेत. त्यासोबत ते आपली सेवा देत असतात. परंतु शहरात असे अनेक लॉजिग अँड बोर्डिंग आहेत. जे कायम वाईट काम करत नावात बदल करून विवादित असतात. त्याची ओरड असते की अनेक स्वघोषित समाजसेवक, बोगस पत्रकार आमची वारंवार तक्रार करतात तसेच पोलीस चेकिंग मुळे व्यवसाय करतांना आम्हाला अनेक अडचणी ना सामोरे जावे लागते. त्याच बरोबर भाडे तत्ववार असल्यामुळे हॉटेल चे वारंवार वाढणारे भाडे त्यामुळे वाढणारा मानसिक त्रास जर कमी करायचं असल्यास व्यवसाय विषयी लिहताना पर्याय म्हणजे व्यवसायात ‘बदल जेथे उत्पन्न कमी आणि खर्च जादा’ असा व्यवसाय करणे मानसिकदृष्ट्या योग्य नाही. सदर हॉटेल मालक- चालकांनी यावरून असा बोध घ्यावा की आपण आपला व्यवसाय बंद करून नवीन व्यवसाय सुरू करणे म्हणजे वरील समस्यांवर मात करू शकतो. यासाठी ‘आपले सरकार’ नेहमी प्रयत्नशील असते. विविध योजना, तसेच कर्ज देत असते त्याचा योग्य वापर करून आपला विकास करावा हेच उद्दिष्ट. ★★★

Scroll to Top