तुमच्या तक्रारी तुम्हीच मांडा, त्रयस्थ व्यक्ती चालणार नाही!

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : कोणत्याही व्यक्तीच्या गाऱ्हाण्याबाबत आता त्या व्यक्तीच्या जवळच्या, ओळखीच्या किंवा नात्यातील व्यक्तीलाही आवाज उठवता येणार नाही. किंवा कोणाही सामाजिक किंवा राजकीय कार्यकर्त्याला किंवा कुठल्याही संस्था, संघटनांनासुद्धा आवाज उठवता येणार नाही. व्यक्तीला स्वतःच्या प्रश्नांबाबत स्वतः पत्रव्यवहार करावा लागेल, तरच त्याची दखल घेतली जाईल, असा चमत्कारिक आदेश महाराष्ट्र शासनाने जारी केला आहे.
एखाद्या व्यक्तीच्या कुठल्याही तक्रारीबाबत त्रयस्थ व्यक्तीने किंवा कुठल्या संस्था-संघटनांनी जर शासनाशी पत्रव्यवहार केला. तर अशा पत्रव्यवहाराची दखल घ्यावी का, त्या पत्रव्यवहाराला उत्तर द्यावे का किंवा त्यावर कार्यवाही करावी, हा मुद्दा शासन दरबारी प्रलंबित होता. त्याबद्दलच्या शंका अधिकाऱ्यांकडून वारंवार उपस्थित केल्या जात होत्या, असा सरकारचा दावा आहे. त्यावर उपाय म्हणून शासनाने ३ डिसेंबर १९५८ रोजीचा म्हणजे जवळजवळ 60 वर्षांपूर्वीचा शासन निर्णय संदर्भासाठी दिला आहे. त्यानुसार शासनाशी होणाऱ्या पत्रव्यवहाराची तड कशी लागवड लावावी याचे नियम घालून दिलेले आहेत. कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या् प्रश्नांबाबत स्वतः पत्रव्यवहार करणे अपेक्षित आहे.
दुसऱ्या कुठल्या संस्था-संघटनांनी पत्रव्यवहार केल्यास त्याची दखल घेऊ नये असं शासन निर्णय १४ ऑक्टोबर २०१९ तसेच 18 फेब्रुवारी २०२५ नियमात म्हटलेलं आहे. सामान्य प्रशासन विभागाने / उच्च व तंत्र शिक्षण विभाग ने जारी केलेल्या या निर्णयामुळे आता यापुढे सामाजिक संघटनांनी कुठल्याही व्यक्तीच्या अन्यायाबाबत पत्रव्यवहार करणे निरर्थक ठरणार आहे. शासकीय अधिकाऱ्यांना त्या पत्रव्यवहाराची दखल घेण्याचं किंवा पत्रव्यवहाराला उत्तर देण्याचं बंधन असणार नाही. महाराष्ट्रात यापुढे कोणत्याही विषयावरची लढाई वैयक्तिक पातळीवरच लढावी लागणार आहे. त्यावर सामूहिक आवाज उठवण्याचा मार्गच शासनाने बंद करून टाकला आहे.
अनेकदा सर्वसामान्य नागरिक आपल्यावरच्या अन्यायाबाबत किंवा कुठल्याही समस्यांबाबत सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांची मदत घेत असतात किंवा सामाजिक विषयांवर काम करणार्‍या संस्था संघटनांचे सहकार्य घेत असतात. सर्वच नागरिकांना शासनाशी नेमक्या भाषेत पत्रव्यवहार करणे शक्य नसल्याने किंवा एकेकट्या पत्रव्यवहाराची शासन दरबारी नीटशी दखल घेतली जात नसल्याने, सामाजिक संघटना स्वतः पत्रव्यवहार करून प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचं काम करीत असतात. त्यामुळे अनेक प्रकरणात वेगाने न्याय मिळवणं नागरिकांना शक्य होतं.
परंतु माननीय उच्च न्यायालयाने पारित केलेले आदेश तसेच, मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सुचना विचारात घेऊन संबंधितांना निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन परिपत्रक:- दिनांक ३ डिसेंबर, १९५८ ची अधिसुचना आणि दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९ च्या परिपत्रकानवे त्रयथ व्यक्तीकडून प्राप्त तक्रारींवर करावयाच्या कार्यवाहीची कार्यपदती विहित करण्यात आली आहे. सदर कार्यपदती / तरतुदी विचारात घेऊन, तसेच, वर नमूद केलेले विविध न्यायालयीन आदेश विचारात घेता, प्रकरणाशी संबंधित नसलेल्या व्यक्ती (त्रयस्थ) अथवा तत्संबंधितांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी / अर्ज / निवेदने अथवा धमकी विचारात घेऊ नये असे निर्देश देण्यात येत आहेत. विशेषतः अश्या प्रकरणी कार्यवाही करताना ती कोणत्याही न्यायालयीन निर्णयाशी विसंगत होणार नाही याची दक्षता विभागातील सर्व अधिकाऱ्यानी घ्यावी. ★★★★★

Scroll to Top