अनियमित पाणी पुरवठ्याने उल्हासनगर मधील नागरिक हैराण!

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर शहर गेल्या अनेक वर्षांपासून पाणी समस्येने ग्रासले आहे. उल्हासनगर शहराला पाणीटंचाईची समस्या नवीन नाही आहे. पाणीपुरवठा योजना अंतर्गत कोटी रुपये खर्च करून नवीन जलवाहिन्या उभारण्यात आल्या. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही आहे. याशिवाय दुषित पाणीपुरवठा, गळक्या जलवाहिन्या या नित्याचीच झाली आहेत. याला जबाबदार म्हणजे महानगरपालिका पालिकेचे बेजबाबदार अधिकारी आहेत. या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वर कोणाचाही वचक राहिला नाहीये. यामुळे उल्हासनगरवासी या पाणी समस्ये मुळे ग्रासले आहेत. अनेक वेळा ‘पाणी पेटणारे’ उपोषण ही झाले आहे. परंतु ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी अवस्था उल्हासनगरवासियाची झाली आहे. यावर उपाय म्हणजे संबधित जलशक्ती मंत्रालय तसेच लोकप्रतिनिधीनी जेव्हा जाब विचारतील, पाठपुरावा करतील तसेच नागरिकांच्या पाणी समस्ये बाबत तात्काळ दखल घेतील तेव्हाच उल्हासनगरवासीयांना नियमित स्वच्छ पाणी पिण्यास मिळेल. ★★★★★

Scroll to Top