®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : घरा-घरात शासकीय योजना पोहोचवा हा उदान्त हेतू घेऊन उल्हासनगर परिमंडळ 4 येथून प्रकाशित होत असलेल्या मराठी मासिक ‘पाठपुरावा’ या वृत्तपत्रास शेवट परियत साथ देण्याची विनंती मासिकाचे मुख्य संपादक संदीप अरविद विसपुते यांनी सदर बातमी मधून केली आहे. शासनाच्या विविध लोकहितासाठी असलेल्या योजनांचा लाभ प्रत्येक व्यक्तीस मिळावा. कोणताही लाभार्थी शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचीत राहू नये. याकरिता स्थानिक वृत्तपत्राच्या माध्यमातून शासनाने प्रकाशित करावी. त्याच बरोबर संबधित विभागाच्या नोडल अधिकाऱयांना या बाबत सूचना देत विशिष्ट योजनांची अंमलबजावणी होते की नाही यावर देखरेख ठेवावे. त्याच बरोबर ग्रामीण व शहरी विभागातील स्थानिक वृत्तपत्रांना प्रथम प्राधान्य देत. त्यांच्या डिजिटल लिंक वर किंवा भ्रमणध्वनी च्या माध्यमातून योजनाची माहिती द्यावी. वृत्तपत्र कोणतेही असो त्यात प्रकाशित झालेल्या बातमीची तात्काळ दखल घ्या कारण कोणतेही माध्यम हे जनतेचे प्रतिनिधित्व करत असते. त्यामुळे प्रकाशित होत असलेल्या बातम्या वर तात्काळ दखल घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे. शासनाने व जनतेने सदैव पत्रकाराच्या पाठीशी उभे रहा. असे या बातमीतून ‘पाठपुरावा’ चे मुख्य संपादक संदीप अरविद विसपुते यांनी सांगितले आहे. ★★★★★