®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर परिमंडळ 4 चे उपायुक्त श्री.सचिन गोरे, सहायक पोलीस आयुक्त श्री.अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनिल पडवळ, श्री. विक्रम रामसिंग गौड, गुन्हे पोलीस निरीक्षक व सर्व पोलीस कर्मचारी यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे ते व्हीनस पर्यत जनतेला सूचना देत रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्च मध्ये एसआरपीएफ चे जवान आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाणे चे सर्व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.