सावधान! झाडांना इजा झाल्यास गुन्हा दाखल होणार ?

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : झाडांना खिळे ठोकणे, जाहिरात फलक लावण्यासाठी असेल किंवा झाडांवर लाईटिंग माळ टाकण्यासाठी खिळे ठोकले जातात. खरंतर यामुळे झाडांना इजा पोहचत असते. विद्रूपीकरण करण्यासाठी सर्रासपणे झाडांना इजा करण्याचे प्रकार सध्या उल्हासनगर पालिकेच्या क्षेत्रात दिसून येते. मात्र त्याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. खरंतर ती साधारण बाब असल्याचा समज नागरिकांच्या मनात आहे. मात्र असे अजिबात नाही. तो एक गंभीर गुन्हा आहे. वृक्ष संवर्धन कायदा 1975 मधील कलम 2 (ग) व 3 अन्वये आणि महाराष्ट्र विद्रूपीकरण कायदा 1995 नुसार झाडांना खिळे ठोकणे त्यावरती बोर्ड, बॅनर लावणे हा गुन्हा आहे. झाडांना सुद्धा संवेदन असतात. स्वत:च्या व्यक्तिगत फायद्यासाठी झाडांना त्रास देणे तसेच झाडांच्या फांद्या तोडणे यांसारखे प्रकार होतात. त्यामुळे पालिकेने असे कृत्य करणाऱ्याचा शोध घेत प्रथम त्यांना सूचना द्यावी. की ज्यांनी झाडांवर फलक, भित्तिपत्रके व जाहिराती खिळे लावून जाहिरात केली असेल त्यांनी तात्काळ झाडांवरून बॅनर-पोस्टर्स काढून टाकावेत. अन्यथा सूचना चे पालन न करणाऱ्यानवर ‘महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विरूपण प्रतिबंध अधिनियम १९९५’ च्या कलम पाच नुसार गुन्हा दाखल करत कायद्याची ची अंबलबावणी करावी. ★★★★★

Scroll to Top