®अधिवेशन वृतसेवा, ठाणे : ठाणे जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पावले उचलली असून विशेष रथ मोहीम आज पासून सुरू केली आहे. ठाणे जिल्हा हा बालविवाहमुक्त बनवणे हा कार्यक्रमाचा प्राथमिक अजेंडा आहे. यासाठी जिल्हा बाल संरक्षण कार्यालय येथून मा. जिल्हाधिकारी श्री. अशोक अंबादासराव शिंगारे साहेब व मा. जिल्हा न्यायमूर्ती श्री. ईश्वर जी सर्यवंशी, मा. श्री महेंद्र गायकवाड जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखून “बाल विवाह मुक्त भारत” रथला रवाना करत अभियानास सुरवात केली. तसेच जिल्ह्यात बाल विवाह रोखण्याची शपथ घेतली. समाजात जागरूकता वाढवणे, बालविवाह रोखणे आणि बालविवाहाच्या घटनांचा प्रभावीपणे अहवाल देणे. या मोहिमेचे उद्दिष्टे आहे. असे संगितले त्यावेळी श्री. रामकृष्ण रेड्डी (बाल संरक्षण अधिकारी, ठाणे), श्रीमती. पल्लवी जाधव, कुमुदिनी, श्री. फतांगडे, श्री. अमोल वाघ, श्री. अविनाश रेड्डी, श्रद्धा नारकर, प्रियांका चाळके, संध्या तटकरे व चाईल्ड लाईन व सेवा संस्थेचे अधिकारी कर्मचारी व जिल्हा महिला बाल विकास चे अधिकारी कर्मचारी, स्नेहालय संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते. ★★★★★