®अधिवेशन वृतसेवा
महाराष्ट्र मोटार वाहन (पाचवी सुधारणा) के सांगते, महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1889 यांच्या नियम 134 पोट नियम (५) अनुसरून (६) कोणत्याही मोटार वाहन मालकास/चालकास पोलीस, पोलाईट, प्रेस (प्रिंटींग प्रेस), या सारखे कोणतेही अक्षरे, अंक, शब्द, चित्र स्टिकर्स किंवा या बाबतीत केंद्रशासन किंवा राज्य शासनाद्वारे जी विनिर्दिष्ट करण्यात आली असतील अशी अक्षरे, शब्द किंवा चित्रे अंक वगळून अन्य कोणतेही दिशाभूल करणाऱ्यावर अंक, अक्षरे, शब्दावर बंदी आहे. खासगी वाहनांवर ‘पोलिस’ अशी पाटी लावणे, ‘पोलिस’ लिहिणे, तसेच पोलिसांचा ‘लोगो’ वापरणे या गोष्टी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगल्याच महागात पडणार आहे. पोलिसांना खासगी वाहनांवर ‘पोलिस’ लिहिण्यास उच्च न्यायालयाने आदेश देऊन बंदी घातली आहेत. पोलिसांनी आपल्या खासगी वाहनावर ‘पोलिस’ लिहिले असले किंवा ‘लोगो’ वापरला असेल, तर त्यांच्यावर मोटार वाहन कायदा, २०१३च्या कलम १३४ प्रमाणे कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे यापुढे पोलिसांना ‘पोलिस’ पाटी लावून खासगी वाहन मिरविता येणार नाही. रस्त्यावर धावणाऱ्या अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांच्या समोरच्या किंवा मागच्या बाजूच्या काचेवर ‘पोलिस’ असे लिहिलेले पाहायला मिळते, तसेच वाहनांवर पोलिसांचा
‘लोगो’ लावलेला असतो. या प्रकारे खासगी वाहनांवार पोलिस नाव टाकून अनेकदा पोलिस कर्मचारीच त्याचा दुरुपयोग करतानाही दिसतात. टोल नाक्यावर कोणी गाडी अडवू नये, वाहतूक पोलिसांनी रस्त्यात गाडी थांबवू नये अशा विविध कारणांसाठी हे प्रकार केले जातात. या प्रकारांवर आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने पोलिस नाव वापरण्यावर बंदीचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे या पुढे पोलिसांना खासगी वाहनांवर पोलिस असे लिहिता येणार नाही पोलिसांच्या लोगोचाही वापर करता येणार नाही. अशा प्रकारे खासगी वाहनावर पोलिस लोगोचा वापर करणाऱ्या, ‘पोलिस’ लिहिणाऱ्या पोलिसांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे.