®अधिवेशन वृत्तसेवा,
दिलीप शिंदे, सोयगाव
सोयगाव : समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या अन्न पदार्थ, फळं यावर यांना मल, विष्ठा, थुंकी लावून ते विक्री होत असल्याचे व्हिडिओ व फोटो बघून सर्व देशात संतापाची लाट निर्माण झालेली आहे. कवियत्री बहिनाबाई चौधरी यांची माणसा माणसा कधी होशील माणूस ही कविता माणसाला मानव धर्माची आठवण करून देणारी आहे. याच माणसाला रॉबीन व बुलबुल पक्षाने माणुसकी व स्वच्छते चे महत्व शिकवले आहे. रॉबीन , बुलबुल, शहामृग, सुगरण, सूर्य पक्षी, शिंजीर आदी पक्षी आपल्या घरट्यात त्यांची पिल्लं जी विष्ठा करतात ती त्यांच्या अन्ना ला लागू नये म्हणून रोज पिलांचा मल घरट्या तुन बाहेर काढून टाकतात व घर एकदम स्वच्छ ठेवतात. सुगरनला सुंदर घरटे व स्वच्छतेच्या सवयीने सुगरण म्हणतात. तीच उपाधी मानवात आली. बुलबुल ची पिल्लं शहाणी होऊन उडून गेल्यावर बुलबुल ने पिलांचे मलमूत्र, पडलेली पीसं सर्व स्वच्छ ठेवून घरट्या ची स्वच्छता ठेवली आहे. विशेष म्हणजे बुलबुल परत ते घरटे वापरत नाही.
छायाचित्रे–रॉबीन पक्षी आपल्या घराट्यातील पिलांनी केलेली विष्टा बाहेर फेकून घरटे एकदम स्वच्छ ठेवतो. आपण जे अन्न पिलांसाठी आणतो त्याला हि विष्ठा लागू नये हि गरिमा पक्षी जपतात तर दुसऱ्या छायाचित्रात
घरट्या तुन पिलं “शहाणी “झाले ली बुलबुल ची पिले उडून गेल्यावर मानवा पेक्षा हि स्वच्छ घरट्या चे चित्र.