®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर: वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने उल्हासगरवासी त्रस झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली संबधीत उल्हासनगर कॅम्प 4 व 5 परिसरातील मुख्य कार्यालय वर धडक मोर्चा काढत जनतेच्या समस्या बाबत संबंधित अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीपकुमार कुंभारे याच्या सोबत चर्चा करत या जनतेच्या समस्यांवर कायमचा तोडगा काढत लवकरात लवकर उपाययोजना करावे असे सांगितले. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी लवकर जागे वा असे म्हणत ‘अंधारमय महायुतीचा’ सामान्य जनता व तसेच उल्हासनगर काँगेस शहराचे जागृत कार्यकर्ते यांनी ‘अंधारमय सरकार’ चा निषेध व्यक्त करत यावर उपाययोजना करा अशा घोषणा दिल्या. तसेच कोरोंना नंतर ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धत या सरकारने आणली पण ती आता अपयशी ठरत आहे. ऑनलाइन शिक्षण तसेच नोकरदार वर्गाला घरी बसून इंटरनेटवर काम करणे गरजेचे झाले आहे. परंतु या अंधारमय सरकारच्या काळात वारंवार विजेचा पुरवठा खंडित झाल्यामुळे घरातून काम करणार्या नोकरदार आणि ऑनलाइन शिक्षण घेणारे वर्ग त्रस्त झाले आहेत. वारंवार वीज खंडित झाल्याने अनेकदा इंटरनेट नेटवर्कमध्ये समस्या येतात. त्यामुळे या जुन्या दुखण्यावर सरकार ने लक्ष घालावे व सामान्य जनतेस नियमित वीजपुरवठा द्यावा. ★★★