घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना शिताफीने अटक

®अधिवेशन वृतसेवा, ठाणे : नारपोली पोलीस ठाणे गु.र.नं १३३६ / २०२४ भा.दं.वि ३७९ या गुन्हयाचा गुन्हे शाखा, घटक – २, भिवंडी येथील अधिकारी व अंमलदार हे समांतर तपास करीत असतांना पोशि/ ६४७६ उमेश ठाकुर, यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे संशयीत आरोपीत १) दुर्गेश उर्फ लाला श्रीराम निशाद वय २२ वर्षे धंदा – भंगार वेचणे राह. क्रांतीनगर, खोपाली पोलीस स्टेशन जवळ, खोपाली, जिल्हा – रायगड २) महाजन रामसमुज यादव वय ३८ वर्षे राह.नवनाथ कॉलनी, शिळफाटा, खोपाली जिल्हा रायगड यांना संशयावरून ताब्यात घेवुन त्यांचेकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. सदर आरोपीतांना विश्वासात घेवुन अधिक तपास केला असता त्यांनी खालील प्रमाणे चोरी, घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. १) नारपोली पोलीस ठाणे गु.र.नं. १३३६/२०२४ भा.दं.वि ३७९, ३४ प्रमाणे २) निजामपुरा पोलीस ठाणे गु.र.नं. ८२८ / २०२४ भा. न्यास संहिता क. ३०५ (अ),३३१ (३),३३१(४),३(५) ३) नारपोली पोलीस ठाणे गु.र.नं ३८० / २०२४ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे ४) कोनगांव पोलीस ठाणे गु.र.नं ७४०/२०२४ भा. दं. वि. कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ प्रमाणे सदर आरोपीतांकडुन एकुण ३,६३,४८९ /- रूपये किमतीचा मुददेमाल त्यात एकुण ७५ इलेक्ट्रीक मोटर, २ एक्साईट कंपनीच्या बॅटऱ्या, ॲल्युमिनियम स्क्रॅप माल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वरील कामगीरी ही श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे ठाणे शहर, व श्री. शेखर बागडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शोध – १, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक – २ भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन सोनवणे, पोलीस उप निरीक्षक रविंद्र बी. पाटील, सहा.पो.उप निरी. सुधाकर चौधरी, पोहवा / १३५४ यादव, पोहवा / १८१९ वामन भोईर, पोहवा / ६८८५ जाधव, पोशि/ ६४७६ उमेश ठाकुर, चालक पोशि/ २०९३ रविंद्र साळुंखे यांनी केलेली आहे. ★★★★★

Scroll to Top