®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : मागील महिन्यांत २८ तारखेला उल्हासनगर परिमडल ४ मधील हिललाईन पोलिस ठाण्यामध्ये १ कोटी रुपयांची खंडणी मागत ५ लाख खंडणी प्रकरणी कोणतेही पुरावे नसतांना ‘प्रहार जनशक्ती’ पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्निल पाटील व राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी यांच्यावर खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
हा गुन्हा खोटा असून अश्या खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल होवू शकतात याबाबत अगोदरच पाटील यांनी लेखी पत्राद्वारे वारिष्ट अधिकाऱ्याना कळविले होते. सदर खंडणीच्या तक्रारी अनुषंगाने कोणतेही पुरावे नसतांना खोडसाळ पद्धतीने गुन्हा दाखल करून उल्हासनगर मधील नगररचनाकार श्री. ललित खोब्रागडे यांनी केलेला भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप श्री. पाटील यांनी करत सदर खोट्या गुन्ह्याविरोधात संबंधितांवर कारवाई होण्याकरीता आज दिनांक ३ जाने २०२५ रोजी मा. पोलिस आयुक्त, ठाणे यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. सदर आंदोलनाची राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी थेट दखल घेत पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्या अनुषंगाने मा. पोलिस आयुक्तांनी सदर तपास स्वतःच्या निरीक्षणात क्राईम ब्रांचकडे सखोल चौकशी करीता सुपूर्द करत असल्याचे आदेश देत संबंधीत दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचे आश्वासन दिले .
अश्या प्रकारे खोटे गुन्हे नोंद करणार्यांच्या विरोधात या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व वकील एकजुटीने सामील झाले. ★★★★★