उल्हासनगर परिमंडळ 4 च्या हद्दीत वेश्याव्यवसायात भाग पाडणाऱ्याना आवरा!

 ● उल्हासनगर दि. 2 जानेवारी 25 रोजी देहविक्री करायला लावणाऱ्या महिला दलाल ‘लक्ष्मी बेन विपुल भाई चिकरोडा’ हिला ‘ठाणे गुन्हे अन्वेषण’ विभागाने सापळा रचून हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत अटक करून 2 तरुणीची सुटका केली.

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर परिमंडळ 4 च्या हद्दीत लॉज च्या नावाखाली खुले आम वेश्या व्यवसाय सुरु आहे. कायम वादग्रस्त असलेले लॉज जसे की सुर्या लॉज, पूनम लॉज, कोहिनूर, सितारा (ओंमकार), वृंदावन, सेंट्रल पार्क असे हे कायम वृत्तपत्रामधून प्रसिद्ध असलेल्या वादग्रस्त लॉजची नावे आहेत. वारंवार या विषयी बातम्या छापून येतं असताना ही स्थानिक पोलिसांनकडून कोणतीही पडताळणी तसेच कारवाई होताना दिसतं नाही कारण त्याचे मुख्य कारण आहे. रेट कार्ड – सेक्शन याबाबत संबंधित लॉज मालक/चालका कडून असे बोलले जाते की *’हम पोलिस को सेक्शन देते जिस्को जो करना है वो करो’* असे बिनदास्त बोलले जाते. त्यामुळे संबंधित स्थानिक पोलीसानी सदर विषयांचे गांभीर्याने चौकशी करत कारवाई करावी. वरील लॉज आणि बोर्डिंग मध्ये रोज रात्री 8 नंतर लॉज मध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या मागणीनुसार त्याच्याशी संबंधित महिलांना शरीर संबंध ठेवण्यासाठी त्याचे सोबत पाठवुन त्याच्या कडून वेश्याव्यवसाय करून घेऊन त्यामोबदल्यात स्वतःची उपजीविका करून अपव्यापार खुलेआम केला जात आहे. याबाबत उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त यांनी संबंधित लॉज वर लावलेल्या सी.सी.टी.व्ही आधार घेत शाहनिशा करत तात्काळ कारवाई करावी. जेणे करून या खुलेआम चालत असलेल्या देहव्यापारावर आळा घालता येईल. ★★★★★

Scroll to Top