पोलीसांनी सर्वसामान्य नागरिकांशी सौजन्याने वागावे – खुशाल अ. विसपुते

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीवर तात्काल दखल घेत नाही. अशी अनेक तक्रारदार/अर्जदाराकडून ओरड असते. अनेकदा तक्रार घेतली जाते पण योग्य समाधान होत नाही. त्यामुळे समाजात पोलीसांनविषयी नकारात्मक भावना निर्माण होत असल्यामुळे ही प्रतिमा बदलण्यासाठी शासनाने शासन परिपत्रक निर्णय क्रमांक एमआयएस २०१६/प्र. क्र. ९७/पोल ११ मंत्रालय, मुंबई  ४०००३२, दिनांक १७ जून २०१६ नुसार असे म्हटले आहे. कि प्रशासन अधिकाअधिक लोकाभिमुख/पारदर्शक बनविण्यासाठी जनतेच्या तक्रारीची  दखल घेणे, त्यांचे वेळेत निराकरण करणे, तक्रारदारांना सन्मानाची वागणूक देणे, त्याच प्रमाणे खोटया, दिशाभूल करणार्या अनेक तक्रारी समाजातील कुप्रवृत्तीचे लोक करत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले  त्याअनुषगांने तक्रारदारांचा लेखी/ऑनलाईन/मेल अर्ज प्राप्त झालेल्याच्या दिनांकापासून २१ दिवसाच्या आत सदर अर्ज बाबत कार्यवाही अहवाल उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. असे सदर परिपत्रकांत म्हटले आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास आलेल्या सर्वसामान्य नागरिकांशी पोलीस कर्मचारी व अधिकार्यांनी सौजन्याने वागा. शांतपणे तक्रारदारांचे म्हणणे ऐकून सहाभुती दाखवा तक्रारदाराची आपुलकीने विचारपूस करा तक्रारदाराच्या जागेवर आपण स्वःताला ठेवून पहा किंवा सदर अर्जदार हा आपल्या कुटूंबातील व्यक्ती आहे. असे समजावून त्याला सूचना देत योग्य मार्गदर्शन करा. तसेच कुठल्याही प्रकारचा दबाव न जुमानता त्यास योग्य न्याय द्या. गुंड प्रवृत्तीना वेळीच शासन करा. मित्रत्चाची भावना ठेवून सहकार्य करा. पोलीस स्टेशन व दवाखाना ही अशी ही दोनच ठिकाणे आहेत. की जिथे व्यक्ती नाईलाजाने व दु:ख घेऊन जात असतो. त्यामुळे आपल्या वाणीत तक्रारदारास मानसिक आधार मिळेल असे वागा. असे ‘ग्रामीण पोलीस’ वृत्तपत्राचे मुख्य संपादक खुशाल अरविंद विसपुते यांनी सदर माध्यमातून सांगितले. पोलिसांकडे खोटी तक्रार करणे हा दंडनीय गुन्हा आहे. कोणत्याही खोट्या माहितीसाठी तक्रार करणारी व्यक्ती पूर्णपणे जबाबदार असेल. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असल्यास 112 डायल करा.

Scroll to Top