®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर परिमंडळ 4 च्या हद्दीत राहणाऱ्या महिलांना, जेष्ठ नागरिक, तसेच दिव्यांग व्यक्तींना संकट समयी तात्काळ मदत कशी देता येईल हा उदान्त हेतू ‘उल्हासनगर सेंट्रल पोलीस स्टेशन’ बाहेरील या बॅनर वरून लक्षात येते. प्रत्येक स्त्रीचा विश्वास महाराष्ट्र पोलिसांचा आपत्कालीन सुरक्षा क्रमांक @112 आहे. ‘महाराष्ट्र पोलीस’ यांच्या कडून महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी कुठलीही घटना व गुन्हा निदर्शनास आल्यास तात्काळ नागरिकांनी आव्हानं या बॅनर द्वारे करण्यात आले आहे. महिला व बालकांसाठी सुरक्षा आपत्कालीन संपर्क 24 तास सदैव जनतेसाठी उपलब्ध आहेत. हे ह्या बॅनर वरून लक्षात येते हेल्पलाईन क्रमांक : 8976004111, 8850200600, 022-45161635 आहेत.