पोलीस उपनिरीक्षक पदाचे काम व कर्तव्य काय आहेत?

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : पोलीस उपनिरीक्षक हे पद पोलीस अधिकारी रँक मधील अगदी सुरवातीच पद आहे(यानंतर पुढे रँक वाढत जातो). यामुळे पोलीस कर्मचारी व वरीष्ठ अधिकारी यांच्या मधील हे पद समन्वय म्हणून खुप महत्वाचे आहे.काही वरीष्ठ अधिकारी या पदाला महत्वाचा कणा असेही म्हणतात. वरीष्ठ पोलीस निरीक्षक हे ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यांना कर्तव्ये पार पाडावी लागतात जसे PSI हे पोलीस ठाण्यात डे ड्युटी अधिकारी नाईट ड्युटी अधिकारी मनुन कर्तव्य करतो.त्या दरम्यान ठाण्यात येणारे तक्रारी,गुन्हे दाखल करणे (वरिष्ठांच्या आदेशानुसार), किरकोळ मॅटर असेल तर समजावून सांगणे,हद्दीत पेट्रोलिंग करणे, समाजकंटकावर (त्यांच्या हालचाली वर) लक्ष ठेवणे, बेकायदेशीर उद्योग धंद्यावर रेड करणे, काही समाजविघातक घटना घडत असेल तर तात्काळ वरिष्ठांना कळवणे व घटनास्थळी जाऊन परिस्थिती हाताळणे वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या आदेशानुसार पुढीलप्रमाणे कायदेशीर कारवाई करावी लागते. बंदोबस्त करावा लागतो. (यामध्ये अनेक प्रकार आहेत. उदा. व्ही आय पी मंत्री, विविध प्रकारचे मोर्चे, यात्रा, जत्रा, नवरात्र, गणपती ईद असे अजून बरेच असतात) तसेच गुन्हेगार यांचे वर लक्ष ठेवणे त्यांच्या हालचाली बाबत माहिती मिळवणे या सर्व गोष्टी करत करत गुन्ह्या चा तपास करणे आरोपींना अटक करणे(गुन्ह्याचे स्वरूप बघून) कोर्टात हजर करणे पुढील कायदेशीर कारवाई करणे असे तपासाचे अनेक प्रकारचे गुन्हे असतात आणि हे सर्वे वेळेत निकाली काढावे लागतात त्यामुळे खर तर खूप पळापळ होते. (नाहीतर वरिष्ठांचे शुद्ध बोलणे ऐकावे लागते. या बरोबरच वरिष्ठांचे आदेशानुसार कायदा व सुव्यवस्था याबाबत आदेशांचे पालन करणे आवश्यक असते वेळोवेळी तत्पर असणे आवश्यक आहे. पूर्वी पासून PSI यांना ‘फौजदार’या नावाने ओळखले जाते.गावात एक दरारा आहे पण पुढे काळानुसार फौजदार चे अधिकार बदलत गेले.

Scroll to Top