®अधिवेशन वृतसेवा, दिलीप शिंदे, सोयगाव, दि.२१ (प्रतिनिधी) – सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे एक चौदा वर्षीय मुलगी तर बोरमाळ तांडा येथील वीस वर्षीय तरुणासह आठ शेळ्यांचा वीज पडून जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.२१ सोमवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली आहे. अजय नथु राठोड वय २० वर्षे रा.बोरमाळ तांडा ता.सोयगाव यांच्यासह आठ शेळ्या तर अश्विनी मच्छिंद्र राठोड वय १४ वर्षे रा.हनुमंतखेडा ता.सोयगाव असे मृतांचे नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी, बनोटी परिसरात गेल्या दहा दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सकाळ पासुन पाऊस विश्रांती घेत दुपारी दोन वाजेपासुन विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकरी मजुर जिवाची पर्वा न करता मिळेल त्या वेळेत शेतातील कामे करीत आहेत. हनुमंतखेडा येथील मृत मुली बरोबर आई वडील, बहीण आणि भाऊ असे पाचही जण हनुमंतखेडा शिवारातील गट क्रमांक १६४ मध्ये कापुस वेचताना अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने आई वडील यांनी मुलांनी घेत घरचा रस्ता धरला घराकडे येतांना आश्विनी सर्वात पुढे होती आणि आई-वडील भाऊ बहीण चालत असतांना अचानकपणे वीज पडली यात अश्विनीचा जागीच मृत्यू झाला सुदैवाने यात आई, वडील, भाऊ आणि बहीण असे चार जणांना काहीही इजा पोहचली नाही. बोरमाळ तांडा येथील अजय नथ्थु राठोड हे सकाळी दहा वाजता नेहमी प्रमाणे जंगलिकोठा शिवारात गट न.१२२ मध्ये बकऱ्या चारण्यासाठी घेऊन गेला. बकऱ्या चारत असतांना अचानक वीज कोसळली यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर आठ शेळ्या ही वीजेचा धक्का बसून मृत्यूमुखी पडल्या.जंगलिकोठा शिवारातील मजुर धावत जाऊन बघितले असता हा प्रकार लक्षात आला. दोघाही मृतांना बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता आरोग्य अधिकारी डॉ रब्बानी शेख यांनी तपासून मृत घोषित केले त्याच्यावर बनोटी येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. बनोटी दुरक्षेत्रात दोन्हीही घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोघेही मुले हे घरातील कर्ते असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.