होय मी एक पोलिस आहे

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर, तुमच्यासारखाच एक साधा सरळ माणूस आहे. मलाही घर आहे बायको आहे मुल आहेत पण कधी मला निवांत घरात बसून माझ्या मुलांबरोबर खेळत बसलेल मला आठवत नाही. मी पोटभरून जेवण करून निवांत झोपून आता मला अनेक वर्ष झालीत पोलिसाच्या नौकरी मध्ये आल्यापासुन कोणतेही धार्मिक; सामाजिक; कौटुंबिक सण-ऊत्सव आनंदोत्सव सहकुटुंब साजरे करू शकलेलो नाही. मलाही वाटत कि कॅलेंडर वर लाल तारीख आली कि मी पण कुठेतरी फिरायला जाव जेवण करून निवांत झोपावं. पण पाहणार्यांना वाटत कि हे साहेब तर निवांत खुर्चीत बसूनच असतात यांना काय काम आहे. माझ्या घरी जाऊन विचारा माझ्या मुलांना कि बाबा कुठे आहेत ते सांगतील. तुम्हाला “कि आमचे बाबा २ दिवस झाले अमुक गावाला अमुक मंत्र्याच्या दौऱ्या मुळे तिकडेच आहेत उद्या येतील कदाचित मी शपथ घेतली होती कि जो पर्यंत माझ्या समाजात शांतता आणि सुव्यवस्था येणार नाही तोवर मी शांत बसणार नाही पण आज काळ बदललाय पोलिस म्हणजे एक फुटबॉल बनलाय एकीकडून जनता लाथाळ तेय तर दुसरी कडून राज्यकर्ते आणि त्यात भरीस-भर म्हणुन सर्वच द्रुक-श्राव्य प्रसिध्दी माध्यमे आणि त्यांचे सर्वच प्रतिनिधी पण नेहमीच न चुकता आम्हां पोलीसांनाच टार्गेट करताहेत मला हक्क नाही संप करण्याचा मला एकही सुट्टी मिळत नाही. माझ्या आप्तेष्ट, दोस्त-भाई-रिश्तेदार; शेजारी-पाजारी आणि माझे कुटुंबीय ह्यांच्या सुख-दुःख प्रसंगी मला कुठेही जाता येत नाही माझ कर्तव्य सोडून आम्ही पोलीस आपली शासन यंत्रणा आणि राज्यकर्ते ह्यांच्याकडुन कायम स्वरूपी दुर्लक्षित आणि उपेक्षित आमच्या पोलीसांच्या न्याय्य मागण्या मांडण्यासाठी आमची पोलीसांची कोणतीही संघटना अगर युनियन नाही एवढेच नव्हे तर आमच्या पोलीसांच्या व्यथा शासन दरबारी मांडायला आम्हां पोलीसांना कोणतेही व्यासपीठ देखील ऊपलब्ध नाही. मग आम्हां पोलीसांच्या व्यथा; अडी-अडचणी; समस्या आणि न्याय्य मागण्या मांडण्यासाठी आम्ही कोणाकडे आणि कशी दाद मागावी ह्याचा कधीतरी आणि कोणीतरी विचार केला होता काय ? किंवा भविष्यात तरी आम्हां कायम स्वरूपी दुर्लक्षित आणि उपेक्षित असलेल्या पोलीसांच्या व्यथा समझुन घेऊन आम्हां पोलीसांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही पोलीसांनी कोणाकडुन करावी ? कधीतरी कोणीतरी आम्हां कायम स्वरूपी दुर्लक्षित आणि उपेक्षित असलेल्या पोलीसांच्या व्यथा; अडी-अडचणी;समस्यांकडे गांभीर्याने बघेल काय आमच्या पोलीसांच्या न्याय्य मागण्या शासन दरबारी कोणीतरी कधीतरी पोहोचवेल काय ? आम्हां पोलीसांना नक्की केंव्हा न्याय मिळेल ? ★★★★★

Scroll to Top