®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर :- राज्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयच्या संबंधित सामान्य नागरिकांची कामे जलदगतीने होण्यासाठी कार्यालयीन कार्यपद्धती शासनाच्या नियमपुस्तिकेत व शासन परिपत्रकात नमूद असताना सामान्य जनतेच्या तक्रारी, न्यायालयीन प्रकरणे ही नागरिकांच्या सनद व संबधीत शासन निर्णया नुसार विशिष्ट कालावधी निकालात काढावे या बाबत विशेष दक्षता घेन्याबाबात वारंवार शासना कडून संबंधित कार्यालयास विशेष सूचना दिल्या जात असताना यावर संबंधित कार्यालय प्रमुख हे मात्र ‘सारे उलथ्या घड्यावर पाणी’ या म्हणी प्रमाणे म्हणजे ‘कितीही श्रम वा इलाज वा उपदेश केला तरी काही परीणाम नाही.’ अशा म्हणी प्रमाणे वागणारे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी कार्यरत असल्यामुळे ‘पारदर्शक सरकार’ कडे लोकांची बघण्याची भूमिका ही मालिन होत आहे. अशा अधिकारी वर्गास वेळेतच आवर घालत त्याच्यावर योग्य ती तात्काळ कारवाई करा असे सामान्य जनतेमध्ये बोलले जात आहे.