विविध प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावाखाली परिसरात दादागिरी करणार्यांना आवरा

उल्हासनगर: उल्हासनगर परिमंडळ 4 च्या हद्दीत असे अनेक छोटे-मोठे परिसर आहेत. त्या ठिकाणी राहणारे काही असे व्यक्ती आहेत. जे विविध पक्षाच्या बॅनर व राजकीय वरदहस्त असल्यामुळे सामान्य लोकांनवर दादागिरी करतांना दिसतात. अशा दबंग व्यक्तींवर तात्काळ प्रतिबंध कारवाई करणे आवश्यक आहे. असे जनतेमधून बोलले जात आहे. हे लोक गैरकायदेशीर मंडळी जमा करून परिसरात दहशत अशांतता पसरवण्याचे काम करत असतात. अशा झोपडपट्टी दादांनवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी व कोणत्याही दबावाला बळी पडू नये असे बोलले जात आहे. समाजामध्ये शांतता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंध कारवाईची आवश्यकता आहे. रोगावर उपचार करण्यापेक्षा तो होऊ नये, म्हणून प्रतिबंध करणे उत्तम. परिसरात समाजात शांतता ठेवायची असेल तर असामाजिक प्रवृत्तीना अवैध धंद्यायांना वेळीच पायबंद बसणे गरजेचे आहे. गुन्हेगाराला गुन्हा केल्यानंतर न्यायालयीन कारवाई नंतर शिक्षा होईलच, परंतु गुन्हे घडूच नये, म्हणून अगोदरच उचित पाऊल उचलणे हे गरजेचे आहे. (ग्रामीण पोलीस वृत्तसेवा)

Scroll to Top