ठाणे जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा

®अधिवेशन वृतसेवा, ठाणे : 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात श्री. मेहंद्र गायकवाड, (जिल्हा महिला बाल विकास अधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली ‘संविधान दिन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी श्री. रामकृष्ण रेड्डी, (जिल्हा बाल स्वरक्षण अधिकारी, श्री. फतांगडे, श्रीमती. पल्लवी जाधव मॅडम, श्रीमती, कुमुदिनी, श्री विद्याधर गावंकर, श्री. अमोल वाघ, श्री. कृष्ण मोरे, श्री. उमेश, श्री. दीपक जिवलगे, विनोद दाभाडे व सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ह्यात शहिद झालेल्या जवान व नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. ★★★★★

Scroll to Top