संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्या निमित्ताने सिल्लोड येथे रोपण डॉ. संतोष पाटील यांचा हरितवारी उपक्रम    

®अधिवेशन वृतसेवा, दिलीप शिंदे/सोयगाव : आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या समाधी मंदिराच्या उजव्या बाजूला दैवी असा सुवर्ण पिंपळ नावाचा देववृक्ष आहे ,तो भारत भूमीवरील 2500 वर्ष वयाहुन अधिक व सर्वात प्राचीन वृक्ष असून सदर वृक्ष धनाची देवता कुबेराने लावला आहे असा संदर्भ स्कंद पुराणात आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आई माता रुख्मिनी यांनी या वृक्षास सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातल्या आहेत.या देववृक्षाच्या फळांचे बीज डॉ.संतोष पाटील यांनी आळंदी येथून संकलन करून त्यापासून रोप बनवून ते आज सिल्लोड च्या हनुमान नगरस्थित मारोती मंदिर परिसरात आज माऊलिं च्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्ताने पर्यावरण प्रेमी व रामकृष्ण विद्यालयाचे प्रा. ए. जे. सोनवणे सर, आर. बी. पाटील सर, प्रा. आर. डी. सोनवणे सर व डॉ. पाटील यांच्या हस्ते रोपण करण्यात आले.सोनवणे यांनीचं झाडाच्या संगोपणा चे पालकत्व स्वीकारले.डॉ पाटील यांनी आजवर 10 हजार भारतीय झाडे लावून जगवलीही आहेत.
देववृक्ष महती अभंगातून– जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ l अंगी ऐसें बळ रेडा बोले ll -संत तुकाराम, धन्य इद्रायणी सोन पिंपळाचा पार l धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ll–संत नामदेव
पिंपळाची पर्यावरनातील “स्वर्नीम” भूमिका -पिंपळाची फळे खाणारे पक्षी–हळद्या,तांबट,हरोळी,किरपोपट,राखी धनेश, लालबुड्या व शिपाई बुलबुल आदी 22 प्रकारचे पक्षी. घरटी करणारे – काळी शराटी,रात बगळा, गाय कावळा,डोमकावळा, आयबीस, ई 10 ते 12 प्रकारचे पक्षी व इतर वन्यजीव यांचा अधिवास यावर आहे. निसर्ग संवर्धनासाठी हरितवारी-पिंपळाचे 1 झाड 22 जातींच्या पक्षांना अधिवास असणारा वृक्ष असून देशात हिरवाई वाढीस लागेल, हजारो वन्यजीवांच्या अन्नासाठी पंगती यावर बसतील व जैवविविधता वाढीस लागावी हा हेतू यामागे आहे.-डॉ.संतोष पाटील, पर्यावरण संवर्धक, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड

Scroll to Top