काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचे धान्य संतप्त ग्रामस्थांनी पकडले, महसुलची उदासीनता तर पोलीस चार तासानंतर पोहचले घटनास्थळी, जरंडी गावातील घटना..

®अधिवेशन वृतसेवा, दिलीप शिंदे/सोयगाव दि. २९ : चार चाकी वाहनाद्वारे काळ्या बाजारात रेशन चा गहू,तांदूळ विक्रीसाठी घेऊन जाणारे अकरा क्विंटल धान्य संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजता चार चाकी वाहन अडवून जरंडी गावाजवळ पकडले दरम्यान वाहनांच्या मागे पुन्हा तीन मोटारसायकल वरही धान्य आढळून आल्या मुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे..
सिल्लोड तालुक्यात काळ्या बाजारात रेशन चे गहू तांदूळ धान्याच्या गोण्या विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यांना जरंडी गावाजवळ संतप्त ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून ग्रामपंचायतीच्या स्वाधीन केले दरम्यान ग्रामपंचायतने स्थानिक पंचनामा करून उपसरपंच संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, दिलीप पाटील यांनी सोयगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली.मात्र तब्बल चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास सोयगाव पोलिसांनी जरंडी येथे घटनास्थळी पोहचले. याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी वाहनांसह तीन गोण्या गहू,सात गोण्या तांदूळ, अंगणवाडी पोषक आहार-दोन गोण्या,एक गोणी ज्वारी असे एकूण अकरा क्विंटल रेशनचे धान्य जरंडी गावातून जप्त केले आहे या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे जरंडी गावाकडून सिल्लोड कडे ओमीनी गाडी क्र-एम एच-४३,व्ही-६२८८ मध्ये व मोटारसायकल क्र-एम एच-२० बी व्ही-००८२,एम एच-२० ए व्ही-९४८२ आणि एम एच-२०,ए यु-९६७९ काही गोण्या दुचाकी वर रंगेहाथ पकडून अफरोज हमीद शेख,समीर शेख हमीद, मिरज शेख खलील, जुबेर शेख(चारही रा शिवना ता सिल्लोड,)इकबाल तडवी(रा निंबायती ता सोयगाव),शेख नाजीम शेख चांद(रा सोयगाव)व इतर चार अश्या दहा जणांच्या ताब्यातून रंगेहाथ पकडले. सदर रेशन चे गहू तांदूळ व अंगणवाडी पोषक आहार असे अकरा क्विंटल धान्य सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी हस्तगत केले अद्याप सोयगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.
चौकट- रेशनचा गहू,तांदूळ व अंगणवाडी पोषक आहार विक्रीसाठी घेऊन जाणारी चारचाकी ओमनी व दुचाकी जरंडी येथील स्थानिक नागरिकांनी पकडले.याबाबत उपसरपंच संजय पाटील यांनी तहसीलदार मनीषा मेने व सोयगाव पोलीस ठाण्यात भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. परंतु राजकीय दबावाला बळी पडणाऱ्या तहसीलदार मनीषा मेने यांनी दखल घेतली नाही. तर तब्बल चार तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहचल्याने नागरिकांमध्ये अधिकाऱ्यांविषयी संशय व्यक्त करीत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Scroll to Top