ई-फायलिंग विंडो सुरू; वार्षिक अहवाल ऑनलाइन सादर करणे बंधनकारक

®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर : भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत प्रेस रजिस्ट्रार जनरल कार्यालयाने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी वार्षिक अहवाल (Annual Statement) सादर करण्यासाठी ई-फायलिंग विंडो सुरू करण्याची घोषणा केली आहे.
https://presssewa.prgi.gov.in/#/ प्रेस सेवा पोर्टलवर ही सुविधा 1 एप्रिल 2026 पासून उपलब्ध होणार असून सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आपले अहवाल केवळ ऑनलाइन पद्धतीने सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापुढे कोणतीही कागदी किंवा ऑफलाइन सादरीकरणे स्वीकारली जाणार नाहीत.
नियमांनुसार, प्रत्येक प्रकाशकाने संपूर्ण आणि अचूक माहिती निर्दिष्ट नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. तसेच अहवाल सादर करण्यापूर्वी त्याची पडताळणी करणे बंधनकारक आहे.
हा वार्षिक अहवाल 31 मे 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक असून, विलंब झाल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास संबंधित कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
तांत्रिक अडचणी आल्यास प्रकाशकांना (0I l -24320025) Email: it-helpdesk.rni@gov.in हेल्पडेस्कच्या माध्यमातून मदत मिळणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Scroll to Top