- सर्वात महत्त्वाचे आपण तक्रार ही कोणत्याही पोलीस चौकीमध्ये नोंदवू शकतो म्हणजेच ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणच्या जवळच्या पोलीस चौकीमध्ये आपण तक्रार ही नोंदवू शकतो.
- पोलीस तक्रार नोंदवल्यानंतर नोंदविलेल्या तक्रारीची एक प्रत आपल्याजवळ ठेवावी व त्यावर तक्रार नोंदवून घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याची सही घ्यावी.
- जर गुन्हेगाराकडून आपल्याला मारहाण झाली असेल तर त्वरित जवळच्या पोलीस चौकीत तक्रार नोंदवून तेथून सरकारी दवाखान्याचे पत्र घेऊन सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करावी, त्याचबरोबर सरकारी दवाखान्यात देखील प्रमाणपत्र मिळते ते तिथून घेऊन पोलीस चौकीत आणून द्यावे व एक प्रत तुमच्याजवळ ठेवावी.
- त्यानंतर स्वतः केलेली तक्रार संपूर्ण स्वतः वाचून किंवा एखाद्याकडून वाचून घेऊन तरच त्यावरती सही किंवा अंगठा करावा अन्यथा आपल्याला फसवले देखील जाऊ शकते.
- आपण ज्या पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार करणार आहोत म्हणजेच आपली तक्रार जी पोलीस अधिकारी नोंदवून घेणार आहेत त्यांचे नाव व बिल्ला क्रमांक काय आहे याची नोंद आपण आपल्याकडे ठेवायला पाहिजे जेणेकरून पुढे आपल्याला सांगता येईल की मी यांच्याकडे तक्रार नोंदवली होती.
- महत्त्वाची बाब म्हणजे स्त्रियांना किंवा पंधरा वर्षाखालील मुलांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवता येत नाही असा कायदा आहे.
- पोलीस किंवा संबंधित अधिकारी जर तुमची तक्रार नोंदवून घेत नसतील तर तुम्ही थेट न्यायालयामध्ये देखील जाऊन तक्रार करू शकता.