®अधिवेशन वृतसेवा, साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये काँग्रेस, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा सदैव जपण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी मी स्वत: आणि महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्यातच आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने शाहू, फुले, आंबेडकर त्यांच्या विचाराला संपवण्याचं पाप मनमानी भाजप प्रणित एकनाथ शिंदेचे सरकार करते आहे. त्याच्या विरोधात जनतेमध्ये भयानक राग आहे”, असे नाना पटोले म्हणाले.