बेकायदेशीर स्त्री बीज विक्री रॅकेटचा पर्दाफाश; एसीपी शैलेश काळे यांचा गौरव

®अधिवेशन वृत्तसेवा, अंबरनाथ : बदलापूर पूर्व पोलिस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर स्त्री बीज (अंडाणू) विक्री रॅकेटचा पर्दाफाश करून आरोपींना अटक करण्याची उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे. या धाडसी आणि प्रभावी कारवाईबद्दल पोलिस अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली.
या कारवाईमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल श्री. शैलेश सुलोचना बाबुराव काळे, सहायक पोलिस आयुक्त, अंबरनाथ विभाग, ठाणे शहर यांना पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे (ठाणे शहर) यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कारवाईमुळे गरजू व असहाय महिलांचे शोषण करणाऱ्या बेकायदेशीर रॅकेटवर मोठा आळा बसण्यास मदत झाली असून पोलिस दलाच्या सतर्कता आणि तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील काळातही अशाच प्रकारे प्रभावी व धाडसी कामगिरी करण्याचे आवाहन केले आहे.

Scroll to Top