
®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर : दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना, सेवा आणि लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित केलेले एक खिडकी प्रणाली (Single Window) https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in/ डिजिटल व्यासपीठ आहे. या पोर्टलद्वारे पारदर्शक, कार्यक्षम व कालबद्ध सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रमाणित डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येतो. या पोर्टलचा मुख्य उद्देश दिव्यांगांना शासकीय कल्याणकारी सेवा सुलभपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे त्याद्वारे त्यांचे साक्षमीकरण करणे हा आहे.
दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजना, सेवा आणि धोरणांचा लाभ सहजपणे मिळावा यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in/ या संदर्भात तयार करण्यात आलेल्या माहितीपर व्हिडिओमध्ये पोर्टलचा वापर कसा करायचा, नोंदणी कशी करायची तसेच विविध योजनांचा लाभ कसा घ्यायचा याबाबत स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन करण्यात आले आहे. दिव्यांग नागरिकांनी पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर शासनाच्या विविध योजना, सेवा आणि लाभ सहजपणे उपलब्ध होणार असून त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे दिव्यांग नागरिकांना अधिक सुलभ आणि पारदर्शक सेवा मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.