पत्रकारितेत वेगळी ओळख निर्माण करणारे खुशाल विसपुते

®अधिवेशन वृतसेवा; उल्हासनगर : सामाजिक विषयांप्रती तळमळ, शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी न्याय मिळवून देण्याची भूमिका तसेच पत्रकारितेची आवड जपणारे खुशाल अरविंद विसपुते यांचा ११ मे रोजी वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. खुशाल अरविंद विसपुते यांनी आपल्या आई-वडिलांनाच जीवनातील खरे गुरू मानले असून कुटुंबाला विशेष महत्त्व दिले आहे. “माझा भाऊ हाच माझा खरा मित्र आहे,” असे ते अभिमानाने सांगतात. वृत्तपत्र वाचन, गाणी ऐकणे आणि फिरणे हा त्यांचा आवडता छंद आहे. विशेषतः दिव्यांग आणि शेतकरी विषयांवरील कायदे समजून घेणे तसेच शेतकरी व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे हे त्यांच्या कार्याचे मुख्य क्षेत्र आहे. सध्या ते उल्हासनगर येथे वास्तव्यास असून त्यांचे जन्मगाव गोवंडी आहे. त्यांनी T.Y.B.A. मराठीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.
पत्रकारिता क्षेत्रातही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून ते तब्बल ५ मराठी वृत्तपत्र प्रकाशित करतात. “ग्रामीण पोलीस” हे त्यांचे आवडते मराठी वृत्तपत्र आहे. मराठी भाषेबरोबरच त्यांना गुजराती आणि खान्देशी भाषा देखील अवगत आहेत.
शुभेच्छांचा वर्षाव; ११ मे रोजी वाढदिवसानिमित्त खुशाल अरविंद विसपुते यांच्यावर विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि जनसामान्यांसाठीची आपली तळमळ अशीच कायम राहो व पुढील आयुष्यात त्यांना उत्तम आरोग्य, यश आणि आनंद लाभो, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

Scroll to Top