®अधिवेशन वृतसेवा
उल्हासनगर: समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंध कारवाईची अत्यंत आवश्यक आहे. रोगावर उपचार करण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून प्रतिबंध करणे उत्तम समाजात शांतता ठेवायची असेल तर सामाजिक प्रवृत्तीना वेळीच पायबंद बसने गरजेचे आहे. गुन्हेगाराला गुन्हे केल्यानंतर न्यायालयीन कारवाई नंतर शिक्षा होतेच परंतु गुन्हे घडू नये. म्हणूनच अगोदर उचित पाऊल उचलणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे. समाजात गुन्हेगारी वाढू/घडू नयेत शांतता भंग होऊ नये. समाजस्वास्थ्य राखले जावे. कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न हाताळता यावा. संभावित अपेक्षित गैरतक्रारदार/गुन्हेगारांना गुन्हेपूर्वीच अटकाव व्हावा व त्याचेकडून शांतता भगांचे अगर गंभीर अपराध घडू नये. म्हणूनच फौ.प्र. संहितेच्या प्रकरण 8 मध्ये न्यायालय व पोलीस यंत्रणा यांना कारवाई करता येते. त्याच बरोबर 112 वरून तात्काळ मदत करा.