विठ्ठलवाडी पोलीस ठाणे चे व.पो.नि संजय गायकवाड
पेपर वाचल्या शिवाय चैन पडत नाही अगदी शाळेत असल्यापासून सवय आहे. आज हि वेळात वेळ काढून पेपर वाचतोच कधी पेपर वाचायला मिळाले नाही तर मोबाईल मध्ये ई-पेपर वाचून काढतोच.. वृत्तपत्रे आपल्याला बौद्धिक आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक करतात कारण ती आपल्याला जगभरातील घटनांशी जोडून ठेवतात आणि आपल्याला विस्मृतीच्या बाहेर काढतात. वृत्तपत्रे वाचण्याचे फायदे असंख्य आहेत कारण ते आपल्याला स्थानिक तसेच जागतिक भाषांमध्ये भरपूर माहिती देतात.