अधिवेशन वृत्तसेवा, दिलीप शिंदे, सोयगाव
सोयगाव दि.12 : दसऱ्याला आपटा, कांचन व शमी पूजन करण्याची परंपरा आहे मात्र आपट्याची पाने ओरबाडून ती एकमेकांना सोने म्हणून भेट दिली जातात. आपट्याची लागवड मात्र कोणीही करत नाही यामुळे या झाडांची संख्या धोक्यात आली आहे. शमी च्या झाडावर पांडवांनी शस्त्रे ठेवली होती तसेच भगवान श्रीराम यांनी रावणावर विजय प्राप्त केल्यावर शमी पूजन केले होते म्हणून शस्त्र व शमी वृक्ष पूजन केले जाते.शमि हा धनिष्ठा नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. पर्यावरण व संस्कृती संवर्धन व्हावे यासाठी सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व पर्यावरण संवर्धक डॉ.संतोष पाटील यांच्या “हरितवारी” या उपक्रमाद्वारे शमी व आपट्याचे आज निल्लोड येथील माऊली वारकरी शिक्षण संस्थेत ह.भ.प. रामेश्वर महाराज पवार व धन्य निरंकारी पंथाचे भक्त व युवाकवी पवन ठाकूर व संदीप ठाकूर यांच्या हस्ते रोपण करण्यात आले व रोप संगोपनाची जबाबदारी संस्थेने स्वीकारली. फुलपाखरांसाठी सोन्याचे पान आपट्याच्या पानांवर लेमन ईमिग्रांट, ब्लॅक राजह, ट्राय कलर फ्लॅट या फुल् पाखरांचा हा होस्ट प्लांट असून यावर सदर प्रजातींची फुलपाखरे अंडी घालून कोष विकसित होतो. पान तोडतांना पांनाच्या खालील बाजूस चिपकलेली ही सूक्ष्म अंडी नष्ट होतात व भिरभीरणारे जीवन संपून जैवविविधतेची हानी होते.