उल्हासनगर कॅम्प 4 परिसरात P1, P2 बोर्ड लावा – खुशाल विसपुते

®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर: नो पार्किंग मधून वाहन उचलताना देखील पोलिसांनकरिता काही नियम आहेत. पण त्याचे पालन होत नाही असे चित्र सर्व सामान्य जनतेस पहावयास मिळते. त्यामुळे ‘नो पार्कींग’ मधून वाहन उचलताना नियम पाळला जातो का? असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहे. त्यामुळे संबधित विठ्ठलवाडी शहर वाहतूक, उपशाखा येथील  कार्यालयापासून ते पंजाब नॅशनल बँक, नरहरी सोनार चौक, उल्हासनगर कॅम्प 4 परिसरात P1, P2 बोर्ड अनेक वर्षांपासून नसल्याचे ‘ग्रामीण पोलीस’ वृत्तपत्राचे संपादक खुशाल अरविंद विसपुते यांच्या लक्षात येताच त्यांनी ऑनलाईन ‘आपले सरकार’ पोर्टल च्या माध्यमातून संबधित विभागास लवकरात लवकर P 1, P2 बोर्ड लावण्यात यावे याकरीता अर्ज केला आहे. आशा आहे की लवकरात लवकर सदर बोर्ड लावण्यात येऊन ट्राफिक नियमांचे काटेकोर पणे पालन होईल. ★★★★★

Scroll to Top