कात्रण कापणारा विभाग नको; दखल घेणारा विभाग हवा – खुशाल अ. विसपुते

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : शासन, संस्था, रेल्वे, बेस्ट, खासदार, आमदार, नगरसेवक आदींना अर्ज विनंत्या करूनही त्याची दाद न घेतल्यामुळे आणि योग्य उत्तर न मिळाल्याने शेवटी जागृत दक्ष नागरिक, समाजसेवक वृतपत्राचे संपादक, पत्रकार याचेकडे धाव घेतात. वृतपत्रात प्रसिद्ध झालेली तक्रार/समस्या लपविता येत नाही. नागरी समस्या ची जाण असलेले वृतपत्रे संपादकीय पानावर या समस्याना प्रसिद्धी देत असतात शिवाय अनेक सनसनाटी बातम्याही वृतपत्रातून झळकतात. उदा. फसवणूक, भ्रष्टाचार, लाचखोरी, अन्याय, अत्याचार, पिळवणूक असे अनेक विषयाच्या बातम्या असतात. वाचक ह्या सर्व बातम्या वाचण्यास फार उसुक असतात या बातम्या मधून अनेक विषयाचे निराकरण ही होत असते. पण काही संस्था पुढारी, शासकीय व निमशासकीय यत्रणा हे सारे वाचून, एकूण सुस्त बसतात अनेक विभागात दिवस भर फक्त वृत्तपत्राची कात्रणे कापली जातात परंतु त्यावर काही दखल घेत नाहीत. हा जनतेचा व वृतपत्राचा अवमानच आहे. सदर माध्यमातून महाराष्ट्र शासनास विनती आहे. की असा शासन निर्णय काढावा की शासनाच्या माहिती जनसंपर्क महासंचानालय/सामान्य प्रशासन विभाग तसेच जिल्ह्यातील विविध जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय तसेच सर्व विभागातील जनसंपर्क अधिकारी यांनी आपल्या विभागातील साप्ताहिक, मासिक, दैनिक व इतर ऑफलाइन/ऑनलाइन माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या सार्वजनिक बातम्याच्या समस्याचे निराकरण झाले की नाही. याची फोन द्वारे विचारणा करून संबंधित कार्यालयाचा अभिप्राय घेतल्यास नागरिकांच्या तक्रारींचे जलदगतीने, सोईस्कर आणि प्रभावी निवारण होईल. व यामुळे जरब बसेल व वृतपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्याच्या माध्यमातून सार्वजनिक समस्याना वेळीच न्याय मिळेल. ★★★★★

Scroll to Top