उल्हासनगर मध्ये चाचा नेहरू बाल महोत्सवाला सुरवात

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे यांचे अधिनस्त शासकीय/स्वयंसेवी वालगृह/निरिक्षणगृहातील अनाथ, निराधार, निराश्रीत व बाहय शाळेतील बालकांमध्ये एकमेकांशी आदर, बंधुभाव, सांधिक भावना निर्माण होण्यासाठी तसेच त्यांचे कला गुणांना वाव मिळण्यासाठी सन २०२४ – २५ या वर्षा करिता चाचा नेहरु बाल महोत्सव दिनांक ०२/०१/२०२५ ते दिनांक ०४/०१/२०२५ रोजी पर्यंत अधिक्षक, शासकीय मुलांचे बालगृह (कनिष्ठ), उल्हासनगर-४. जिल्हा ठाणे येथे आयोजित केला आहे. आज रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. संजय बागुल सर, श्रीमती कुंदा पंडित मॅडम, उप शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे, विठ्ठलवाडी पोलिस स्टेशन चे गवळी साहेब, जिल्हा विधी प्राधिकरण ठाणे चे अभंग सर, रामकृष्ण रेड्डी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ठाणे यांच्या शुभ हस्ते बाल महोत्सवाची मशाल पेटवून उद्घाटन करण्यात आले. उपस्थीत सर्व मान्यवरांनी बालकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शासकीय/स्वयंसेवी बालगृह /जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सखी केंद्र, संरक्षण अधिकारी (DV) व  निरिक्षणगृहातील अनाथ, निराधान, निराश्रीत बालगृहांचे 815 बालके उपस्थीत होते. तीन दिवसीय चालणाऱ्या या बाल महोत्सवात कबड्डी, खो-खो, रीले, 400 मीटर धावणे, गोळा फेक, लांब उडी, डॉज बॉल,कॅरम, बुद्धिबळ, चित्रकला, निबंध, हस्ताक्षर इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असुन शेवटच्या दिवशी सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ★★★★★

Scroll to Top