®अधिवेशन वृतसेवा, वाडा : कोयना क्रिकेट असोसिएशनच्या वतीने कोयना प्रीमियर लीग २०२४ क्रिकेट स्पर्धेचे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील उचाट गावातील आस्पि चिल्डर्न अकेडमी मैदानात आयोजन करण्यात आले होते.ही स्पर्धा १९ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाली.
या संपूर्ण लीग मध्ये रायगड ठाणे पालघर जिल्यातील १५६ खेळाडु लिलाव (ऑक्षन) प्रक्रियेच्या माध्यमातून घेऊन १२ संघामध्ये, ही स्पर्धा भव्यदिव्य प्रमाणात आयोजित झाली .या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 100000/- रोख रक्कम आणि भव्य चषक तसेच द्वितीय पारितोषिक 50000/- रोख रक्कम आणि भव्य चषक आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट फलंदाज यांनाही आकर्षक चषक आणि सायकल,सिक्सर किंग फलंदाजाला कुलर आणि चषक तसेच मालिकावीर साठी मोटरसायकल आणि चषक प्रामुख्याने ठेवण्यात आले होते.या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार.मा.श्री.डॉक्टर हेमंत सावरा साहेब ( पालघर – लोकसभा क्षेत्र ) मा.श्री.शांताराम मोरे (आमदार-भिवंडी ग्रामीण विधानसभा) विशेष आकर्षण म्हणून सन्मा.श्री. दिनेश लाड सर (कोच – भारतीय कर्णधार रोहित शर्मा ) तसेच मा.श्री. तुळशीराम सावंत ( अध्यक्ष – कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर ) आणि मा. श्री.अजय जाधव (मा.अध्यक्ष – कोयना प्रतिष्ठाण ठाणे पालघर ) यांचेसह स्पर्धेसाठी कोयना पुर्नवसन मराठा समाज सेवा संघ रायगड, ठाणे,पालघर यामधील माजी आजी पदाधिकारी उपस्थित होते.तसेच कोयना प्रतिष्ठाण ठाणे पालघर अध्यक्ष शशिकांत शिंदे व इतर आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. कोयना क्रिकेट असोसिएशनचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कोयना असोसिएशनचे अध्यक्ष विजय मुसळे, कार्याध्यक्ष – संतोष जाधव, उपाध्यक्ष नितीन जाधव, उपाध्यक्ष नंदू सावंत, सचिव सुरेंद्र जाधव, सहसचिव अनिल पवार , खजिनदार संदेश चाळके, सहखजिनदार अशोक मरागजे, स्पर्धा प्रमुख संदिप चव्हाण आणि मिलिंद शिंदे यांनी अपार मेहनत घेऊन ही लीग यशस्वी करण्यासाठी मोलाचं योगदान दिले, त्याचप्रमाणे मौजे उचाट ग्रामस्थांनी तसेच जाधव कुटुंबीयांनी मोलाचे सहकार्य केले. ही स्पर्धा अनुक्रमे प्रथम-श्री वाघजाई स्पोर्ट्स, द्वितीय-पल्लव इलेव्हन, तृतीय-राणा स्पोर्ट्स, आणि डि जी स्पोर्ट्स चतुर्थ पारितोषिक पटकावले. ★★★★★