®अधिवेशन वृतसेवा, डोंबिवली : दिनांक 01/01/ 2025 रोजी सकाळी ११:३० वाजता चे सुमारास डोंबिवली पोलीस ठाणे येथे सौ अश्विनी अजय किर्पेकर वय ४७ वर्षे, राहणार- बी-४ RM १०१, MIDC फेस २ डोंबिवली पूर्व यांनी माहिती दिली की, त्या गणपती मंदिर मानपाडा ते डोंबिवली रेल्वे स्टेशन असे रिक्षातून प्रवास करीत असताना त्यांची बॅग रिक्षामध्ये विसरल्याआहेत. बॅगेमध्ये मौल्यवान सोन्याचे दागिने 22 तोळे 400 मिली. एकूण रुपये 18,50000/- किमतीचे तसेच कपडे असल्याचे त्यांनी कळविले होते.
तात्काळ सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डोंबिवली पूर्व पोलीस ठाण्याचे वपोनि गणेश जवादवाड यांचे मार्गदर्शनाखाली -पोलीस उप निरीक्षक-नवनाथ वाघमोडे, पोलिस अंमलदार/4300 मंगेश वीर यांनी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कक्षातून हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचा शोध घेऊन, रिक्षा मालकाचा पत्ता शोधून, त्याच्याशी संपर्क करून तक्रारदार यांचे 22 तोळे, 400 मिली सोन्याचे दागिने एकूण किंमत 18,50,000 रुपयाचे दागिने हस्तगत करण्यात आले असून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गणेश जवादवाड यांच्या हस्ते तक्रारदार यांस परत मिळवून दिले आहेत.
तक्रारदार यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांचे मनापासून खूप आभार मानले आहेत. पोलिसांच्या या तत्परतेने केलेल्या कारवाईबाबत नागरिकांकडून देखील पोलिसांचे कौतुक केले जात आहे. ★★★★★