®अधिवेशन वृतसेवा, दिलीप शिंदे, सोयगाव दि. ०७ : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना दि. ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त शासकीय अधिकाऱ्यांकडून सन्मानित, शुभेच्छा न देण्यात आल्याने अधिकाऱ्यांच्या मानसिकतेचे दर्शन घडले असल्याचा आरोप अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी केला आहे.
मराठी वृत्तपत्राचे पहिले संपादक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील सर्वात पहिले दर्पण हे पाक्षिक ६ जानेवारी १८३२ ला सुरु केले. दि. ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रकार हा समाजाचा कणा आहे. पत्रकारांच्या लेखणीमुळेच अनेक पीडितांना न्याय मिळतो सार्वजनिक हिताचे कामे शासन दरबारी मार्गी लागतात. विकासासाठी हातभार लावीत पत्रकार हे समाज हितासाठी जिवाची पर्वा न करता काम करत असतात. सोयगाव येथे डझनभर शासकीय कार्यालये आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या शहरातील पत्रकारांविषयी शासकीय अधिकाऱ्यांमध्ये आकस असल्याचे पत्रकार दिनी दिसून आले. दरम्यान महसूल विभागाच्या गौण खनिज, वनविभाग अवैधरित्या वृक्ष तोड, पोलीस ठाण्यांतर्गत अवैधधंदे, पंचायत समिती कार्यालयांतर्गत ग्रामसेवकांचा मनमानी कारभार करीत राज्यपालांच्या आदेशाला दाखवलेली केराची टोपली, कृषी कार्यालय व इतर कार्यालयाच्या अनागोंदी कारभारा विरोधात जनजागृती करीत पत्रकारांनी सत्यता जनतेसमोर आणण्यासाठी दैनिकातून बातम्या प्रकाशित केल्या त्याचा मनात आकस धरून अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सन्मानित तर सोडाच शुभेच्छा देणे सुद्धा टाळल्याने नागरिकांमधून उलटसुलट चर्चा रंगली आहे. जनतेचे काय व्हायचे ते होऊ द्या मात्र अधिकाऱ्यांना त्यांची मनमानी कारभार करू द्या. त्यांच्या विरोधात बातम्या लावू नका तुमचा यथोचित सन्मान अधिकारी करतील. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनी सत्यतेसाठी काम करावे जनता नेहमीच पाठीशी उभी राहते असा संवाद साधत सुज्ञ नागरिकांनी पत्रकार दिनाच्या पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. ★★★★★