ज्येष्ठ नागरिक समाजाचा महत्वाचा घटक त्यांची काळजी घेण्याची गरज – संजय जाधव

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : ज्येष्ठ नागरिक हे समाजातील महत्त्वाचे घटक आहेत त्यांच्याही वेगवेगळ्या समस्या अडचणी आहेत, त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाच्यावतीने त्यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेऊ आणि त्यांना पोलीस यंत्रणेचा माध्यमातून भक्कम आधार देण्याचे काम यापुढे  पोलीस यंत्रणा यंत्रणा मार्फत करणार असुन तसे पोलिसांचे वतीने कार्य सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिस अतिरिक्त आयुक्त संजय जाधव यांनी आयोजित कार्यक्रमात दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील यांनी केले. प्रसंगी  व्यासपीठावर अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, उल्हासगर परिमंडळ 4 चे उपायुक्त  श्री. सचिन गोरे, तसेच सहायक आयुक्त श्री. अमोल कोळी तसेच अनेक जेष्ठ नागरिक तसेच महिला वर्ग अदि व्यासपीठावर उपस्थित होते. ★★★★★

Scroll to Top