पत्रकारांना मारहाण आणि जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या भाईला भर रस्त्यात पोलिसांचा चोप
डोंबिवली येथील पश्चिमेतील महात्मा फुले रस्ता परिसरात दहशत असलेल्या एका भाईने पत्रकाराला शिवीगाळ करत मारहाण केली. पत्रकाराच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल केला. फुले रस्त्यावरील स्वामी विवेकानंद शाळेजवळ पोलिसांकडून भाईला चोप देण्यात आला.
®अधिवेशन वृतसेवा, डोंबिवली : येथील पश्चिमेतील महात्मा फुले रस्ता परिसरात दहशत असलेला एक भाई रविवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान महात्मा फुले रस्त्यावरून स्वताची मोटार चालवित होता. या भाईने मोटारीच्या दर्शनी भागाचा प्रखर झोताचा उजेड तांत्रिक बदलाने (अप्पर टिप्पर) समोरून दुचाकीवरून येत असलेल्या पत्रकारांच्या डोळ्यावर मारला. त्यामुळे दुचाकीवरील चालक पत्रकाराला काही क्षण दिसेनासे झाले. तो जागीच थांबला. यावेळी मोटारीतील भाईने दुचाकीला वळण देऊन पुढे जाऊन गाडी थांंबवत त्यानंतर पत्रकाराला शिवीगाळ करत मारहाण केली. पत्रकाराच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. फुले रस्त्यावरील स्वामी विवेकानंद शाळेजवळ हा प्रकार घडला. अतिश अशोक शेलार उर्फ मॉन्टी, चैतन्य विलास भोईर उर्फ चैतू आणि इतर 5 जणांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक तपासणी अहवालातील माहिती, अशी की कल्याणमधील चार पत्रकार डोंबिवलीत माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाला रविवारी रात्री आले होते. कार्यक्रम संंपून ते दुचाकीवरून कल्याण येथे फुले रस्त्यावरून जात होते. फुले रस्ता भागात दहशत असलेला एक भाई याच रस्त्याने जात होता. भाईने स्वताच्या मोटारीचा दर्शनी भागाचा दिव्यांचा झोत तांत्रिक बदलाने समोरून दुचाकीवरून येत असलेल्या पत्रकाराच्या डोळ्यावर मारला. समोरील काही न दिसल्याने पत्रकार दुचाकीसह जागीच थांबला. भाईने आपले वाहन पुढे घेत त्यामधून तो उतरला. पत्रकारांना उद्देशून ‘आपण या भागाचे भाई आहोत. येथे जास्त पानपत्ती करायची नाही. नाहीतर येथेच ठार मारून टाकीन,’ अशी धमकी देत भाईने स्वताच्या वाहनातून चाकू बाहेर काढून हवेत फिरवला. ★★★★★