
®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : महाराष्ट्रातील पत्रकारितेमध्ये आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविणारे ‘ग्रामीण पोलीस’ हे वृत्तपत्र असून, त्यांच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा, असे प्रतिपादन विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (व.पो.नि.) अनिल दे. पडवळ यांनी केले.
‘ग्रामीण पोलीस’ वृत्तपत्राने ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक, प्रशासकीय व कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित विषय वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडत पत्रकारितेचा दर्जा उंचावला आहे. समाजात जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
पत्रकारितेच्या माध्यमातून सकारात्मक विचार, सामाजिक बांधिलकी आणि सत्य माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ‘ग्रामीण पोलीस’ वृत्तपत्र भविष्यातही असेच अविरतपणे करत राहील, असा विश्वासही व.पो.नि. पडवळ यांनी व्यक्त केला.