पोलिस व जनतेच्या मनात मानाचे स्थान असलेले वृत्तपत्र म्हणजे ‘ग्रामीण पोलीस’ – पोलिस उपायुक्त सचिन गोरे

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर :‘ग्रामीण पोलीस’ हे वृत्तपत्र महाराष्ट्र राज्य पोलीस दल तसेच सामान्य जनतेच्या मनात मानाचे स्थान निर्माण करणारे असून, जनविश्वासाचा मानबिंदू म्हणून ते लोकप्रिय आहे, असे प्रतिपादन उल्हासनगर परिमंडल ४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी केले.
गोरे यांनी सांगितले की, ‘ग्रामीण पोलीस’ या वृत्तपत्राचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जनतेला आपल्या कर्तव्यांची व अधिकारांची जाणीव करून देणे. तसेच सामाजिक कार्य आणि पोलीस यंत्रणेबाबत जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे वृत्तपत्र सातत्याने करताना दिसते.
सामान्य जनता आणि पोलीस यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करणारे लेखन हे ‘ग्रामीण पोलीस’ वृत्तपत्राचे मोठे सामर्थ्य असून, अशा प्रकारचे सकारात्मक आणि जबाबदार पत्रकारितेचे कार्य आम्हाला अभिमानास्पद वाटते, असेही त्यांनी नमूद केले.
शेवटी त्यांनी ‘ग्रामीण पोलीस’ वृत्तपत्राच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत “जय हिंद” असा संदेश दिला.

Scroll to Top