
®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर मध्ये स्वामी विवेकानंद जयंती निमित ‘साठे क्लास’ तर्फे आयोजित १० वी १२ वी मार्गदर्शन शिबिर ‘प्रेरणा घ्या. . .प्रेरित व्हा’ कार्यकम संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना विठ्ठलवाडी पोलीस ठाणे चे श्री. विक्रम रामसिंग गौड, गुन्हे पोलीस निरीक्षक तसेच त्याचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल श्री. गणेश वडनेरे यांनी १० वी १२ वी च्या विद्यार्थीयांनी आपला अभ्यास कसा करावा करियर ठरवताना कोणते नियम पाळावे ‘पोलिस’ होण्यासाठी विद्यार्थी, युवकांनी स्वयंशिस्त कशी पाळावी. या बाबत प्रेरणादायी मार्गदर्शन दिले. या कार्यक्रमाला साठे क्लास संचालक तसेच सर्व महिला वर्ग, युवा विद्यार्थी उपस्थित होते. ★★★★★